Three killed in tractor-autorickshaw collision on Latur-Barshi road
लातूर, पुढारी वृत्तसेवा
लातूर-बार्शी रोडवर ट्रॅक्टर व ऑटोरिक्षा यांच्यात (सोमवार) दुपारी (दि.19) झालेल्या धडकेत ऑटोतील तिनजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात प्रतीक्षा संतोष पस्तापुरे, सुमन सूर्यकांत धोत्रे व शिवाजी ज्ञानोबा कातलाकुटे अशी मृतांची नावे आहेत, तर पिंकी अनिल धोत्रे, शैलेश भागवत धोत्रे व अभिजीत अशोक घाडगे अशी जखमींची नावे आहेत.
बारा नंबर पाटीवरून एक ट्रॅक्टर लातूरकडे भरधाव वेगात येत होता. त्याच्या विरुद्ध दिशेने एक ऑटो रिक्षा जात होती. लातूर बार्शी रोडवर असलेल्या उड्डाण पुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील तिघांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.