Latur News : गाव आहे मांजरा नदीच्या कुशीत; मात्र प्यायला पाणी मिळते दूषित File Photo
लातूर

Latur News : गाव आहे मांजरा नदीच्या कुशीत; मात्र प्यायला पाणी मिळते दूषित

माचरटवाडीच्या महिलांचा निलंगा पंचायत समितीवर घागर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

There is no availability of drinking water in Machartwadi.

निलंगा, पुढारी वृत्तसेवा माचरटवाडी येथे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाही. ती करून द्यावी अशी मागणी अनेकवेळा करूही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा संताप अनावर झाल्याने या गावातील महिलांनी चक निलंगा शहर गाठले व पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून आपली अडचण मांडली. हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा या महिलांनी दिला. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

माचरटवाडी गावात मागच्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा कुठलेही साधन नाही व माचरटवाडी ढाबळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे मूलभूत सुविधाकडे लक्ष दिले जात नाही.

गावात एक हातपंप असून त्या हातपंपाच्या भोवताली गटारीचे पाणी जात असून त्यामुळे आरोग्य विभागाने पाणी पिण्यास अयोग्य आहे असे सांगितले आहे.

तसेच माचरटवाडी येथील ग्रामस्थ हे शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या शेतातील पाणी हे विकत आणून मागील १५ वर्षांपासून आपली व आपल्या कुटुंबाची तहान भागवित आहेत. तसेच मागच्या दोन महिन्यांपासून गावात सांडपाणीही मिळत नाही.

याबाबत वारंवार ग्राम पंचायतीस माहिती देऊन पण जाणून बुजून हे ग्रामपंचायतचे लोक दुर्लक्ष करीत असल्याने हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. निवेदनाबर सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे, अशोक चव्हाण, लिंबाराज शिंदे, शालू लांबुटे, मंगल टमके, अनुराधा लांबोटे, अंजरबाई शिंदे, लक्ष्मी लांबोटे, सविता लांबोटे, अस्विनी लांबोटे, श्यामा मोरखंडे, सुमन गोलकुंडे, पारवतबाई चव्हाण, पद्मिनबाई कवाडगावे, मनीषा लांबोटे यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT