चाकूर जिल्हा परिषद शाळेमध्ये चोरी Pudhari Photo
लातूर

चाकुरच्या जिल्हा परिषद शाळेत सव्वा दोन लाखांच्या साहित्याची चोरी

पुढारी वृत्तसेवा

चाकूर, पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या खोल्याचे कोंडी कुलुप तोडून २ लाख २५ हजार रुपयाचे १३ संगणक व साहित्य चोरी गेल्याची घटना बुधवारी (दि.25) मध्यराञी घडली. याप्रकरणी चाकूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तपासणी पथकांनी पाहणी करून तपासणी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मुलांची शाळेच्या जुन्या इमारतीतील तिन खोल्यांचे लोखंडी रॉडने कोंडी व कुलुप तोडुन खोलीत प्रवेश केला. यानंतर मुख्याध्यापक कार्यालयातील संगणकांवर सॅनिटायझर टाकून नुकसान केले. तसेच शाळेतील १३ संगणक व संगणक लॅबचे साहित्य असे एकूण २ लाख २५ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरला. याबद्दल मुख्याध्यापक बी.डी. बिराजदार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी ठसे तज्ञाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन विविध ठिकाणचे ठसे घेण्यात आले आहेत. यावेळी पोलीस निरक्षक दत्तात्रय निकम,उपनिरीक्षक राजेश घाडगे, पो.हे. योगेश मरपल्ले, यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरक्षक राजेश घाडगे हे करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT