Heavy School Bag : क्षमता चार किलोंची; पाठीवरचे ओझे १६ किलो ! दप्तराच्या वजनाने चिमुकले बेजार pudhari photo
लातूर

Heavy School Bag : क्षमता चार किलोंची; पाठीवरचे ओझे १६ किलो ! दप्तराच्या वजनाने चिमुकले बेजार

शाळा व्यवस्थापन, पालकांचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

The load of school bags on children's shoulders

जावेद शेख

उदगीर : मुलांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्यास त्यांच्या आरोग्यावर विशेषतः मणके सांध्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात हे वास्तव असताना त्याकडे कानाडोळा करीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे वाढतच आहे. चार किलोचे वजन पेलण्याची क्षमता असताना चारपट वजनाचे दप्तर पेलत बिचारे विद्यार्थी त्यांची शाळा गाठत आहेत.

शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेत मुलाच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याचे निर्देश दिले होते मात्र त्याचा विसर बहुतेक शालेय व्यवस्थापनाला पडला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी क्षमता ४ किलोंची आणि पाठीवर प्रत्यक्ष चारपट वजन घेऊन मुले शाळा गाठत आहेत.

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजन ठराविक असायला हवे या आदेशाचे उल्लंघन झाल्यासंबंधी संस्था शाळेविरोधात कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत यासोबत गृहपाठा संदर्भातही काही नियम असून पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नयेत असे आदेश आहेत दप्तराचे ओझे वाढू नये यासाठी पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी शाळेत अतिरिक्त शालेय साहित्य आणू नये असा नियम आहे.

मात्र तो पाळला जात नाही, पाठ्यपुसत्कांसह विविध स्पर्धा परीक्षा फाउंडेशन शिष्यवृत्ती आर्दीची पुस्तके सोल्युशन बैंक सोबत शाळेत जाणे बंधनकारक केले आहे. एकाच विषयाची वेगवेगळ्या लेखकांची प्रत्येकी तीन पुस्तके खरेदी करणे व सोबत बाळगण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे दप्तराची ओझे तिपटीने वाढत आहे विशेष म्हणजे दिवसभर चालणाऱ्या काही शाळांतून तर दोन वेगवेगळे टिफिन बॉटल सोबत आणायला बॉटर सांगितले जाते.

दोन किलो वजनाच्या टिफिन बॅगची भर वजन वाढवते. स्टेट बोर्ड सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रम सर्वत्र एकच असतात शासनाकडून प्रमाणित केलेल्या एनसीआरटी पार्ट क्रमिक पुस्तकाचे वजन कमी असते ही पुस्तक खरेदी करताना रेफरन्स बुकच्या नावाखाली त्याच विषयाची विविध लेखकांची प्रत्येक शाळा आपल्या सोयीनुसार पालकांना खरेदी करावयाला लावतात.

त्यात सोल्युशन बुक फाउंडेशन आडव्हान्स आदी प्रकारच्या पुस्तकांची भर पडते पाहता पाहता वही पुस्तकांच्या बॅगचे ओझे कधी १५ किलो होते. पालकही आपले पाल्य स्पर्धेत कमी पडू नये यासाठी मुलांच्या आरोग्याचा क्षमतेचा विचार न करता ती मुलांच्या पाठीवर लादत आहेत भविष्यात मुलांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यास पालकसुद्धा शाळेतइतकेच जबाबदार राहतील.

तावडे यांनी कमी केले होते ओझे

तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली होती. त्यांनी शाळेत जाऊन येत्या पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलाच्या दप्तराचे वजन काट्यावर तपासले असतात ते पाहून त्यांनी संताप व्यक्त केला होता व तत्काळ उपायोजना करण्यासाठी सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर गृहपाठ देणे बंद करताना दप्तर घरी न्यावे लागणार नाही अशी व्यवस्था काही शाळांनी केली होती, त्यानंतर पुन्हा जैसे थे पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT