Suraj Chavan surrendered to the police
लातूर, पुढारी वृतसेवा : अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेले मुख्य आरोपी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुरज चव्हाण हे लातूर येथील विवेकांनद पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे चार वाजता शरण आले. त्यांच्यासह अटकेत असलेल्या त्यांच्या नऊ साथीदारांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
चव्हाण व मारहाण करणाऱ्या त्यांच्या साथीदारांवर लावण्यात आलेली कलमे ही सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची असून सर्वोच्य न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे अशी कलमे असणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडता येते व त्या प्रकीयेचा पोलिसांनी अवलंब केल्याचे लातूर येथील ज्येष्ठ विक्षीज्ञ उदय गवारे यांनी सांगितले.
पोलिसांनी चव्हाण यांना पाठीशी घातल्याचा आरोप छावा तसेच अनेक संघटनांनी केला असून प्राणघातक हल्ला असल्याने घाडगे यांचा पुरवणी जवाब घ्यावा व सुरज चव्हाण आणि माराहाण केलेल्या त्यांच्या साथीदारांवर बीएनएसच्या १०९ कलमांतर्गत गुन्हे नांदेवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी सकल मराठा समाजाने लातूरच्या पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले असून १०९ अंतर्गत गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान घाडगे यांच्यावर उपचार सुरू असून विविध क्षेत्रातील अनेकजण त्यांची भेट घेत आहेत.
सुरज चव्हाणला राजकीय सरंक्षण मिळत आहे. आमच्यावर जीवघेणा हल्ला झाला पोलिसांनी काय केले? त्यांच्या कार्यप्रणालीवर माझा संशय आहे. आम्हाला चव्हाण पोलिस ठाण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहीजे.- विजयकमार घाडगे, प्रदेशाध्यक्ष छावा