file photo
लातूर

मोकाट कुत्र्याने घेतला १२ जणांचा चावा, तीन बालकांचा समावेश

Latur News | नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : एका मोकाट कुत्र्याने चाकूर शहरातील तीन लहान बालकांसह अन्य ९ जणांना बुधवारी दुपारी चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यातील ११ जखमींना चाकूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. यामुळे चाकूर शहरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

चाकूर शहरात एका मोकाट कुत्र्याने बुधवारी दुपारी ३ लहान बालकांना चावा घेवून गंभीर जखमी केले. तर कुत्र्याने हिंश्र रूप धारण करून चाकूर शहरातील जय भवानी गल्लीतील नृसिंहाच्या मळ्यात काम करणारे शेतकरी पती पत्नीला गंभीररित्या चावा घेतला. तसेच रोहित सदानंदे (वय २५), अनिता शत्रुघ्न शेंडगे (वय ४०), शादूल मैनोद्दीन पठाण (वय ४०), रेश्मा शादूल शेख (वय ३२), गजानन नारायण झांबरे (वय ३६) यांना कुत्र्याने चावा घेवून जखमी केले. सर्व बाधित रुग्णांना लातूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच शिवकन्या विशाल करंजकर वय २७ यांना चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

या हिंश्र कुत्र्याचे चावा सत्र सुरूच असून त्याने नंतर एक बैल आणि दोन गायींचा चावा घेऊन जखमी केले. यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्याने दहशत निर्माण केली. या मोकाट कुत्र्याला पकडण्यात नगरपंचायत कर्मचाऱ्यांना शेवटी यश आले. त्यामुळे नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT