Latur News : एकल महिलांचा परतूर येथील 'एसडीएम' कार्यालयावर मोर्चा File Photo
लातूर

Latur News : एकल महिलांचा परतूर येथील 'एसडीएम' कार्यालयावर मोर्चा

लाडकी बहीण व 'संजय गांधी' योजना एकत्रित देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Single women march to SDM office in Partur

परतूर, पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी एकल, विधवा, परितक्त्या, निराधार महिलांनी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवार दि. ८ रोजी मोर्चा काढण्यात आला.

यावेळी महिलांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निराधार महिलांना लाडकी बहीण व संजय गांधी निराधार दोन्ही योजना एकत्रित देण्याची मागणी केली. यावेळीकॉम्रेड मारुती खंदारे, जिल्हाध्यक्षा कॉम्रेड सरिता शर्मा, भगवान कोळे रवी भदरगे मुक्ता शिंदे दिगंबर मोरे हरिभाऊ मोरे शेख महमूद गीता डवले शेख प्रवीण, शोभा उकंडे आदी उपस्थित होते.

एसडीएमकडे करण्यात आल्या या मागण्या

के.वाय.सी. च्या कारणाने मागील ५ ते ६ महिन्याचे थकीत राहिलेले अर्थसाह्य वाटप करा. एकल महिलांना महागाई च्या प्रमाणात १० लाखाचे घरकुल द्या. एकल महिलांना प्राधान्य देऊन गावातच मनरेगाचे काम देवून स्थलांतर थांबवा. एकल महिलांच्या पाल्यांच्या लग्नासाठी ५ लाख रुपये द्या. एकल महिलांना ३५ किलो मोफत धान्य द्या. एकल महिलांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्या. एकल महिलांच्या बालसंगोपन योजना निधीत महागाईच्या प्रमाणात वाढ करून प्रत्येकी ५ हजरी रुपये प्रतिमाह द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT