Restoration of lost teeth possible with artificial dental implants
लातूर, पढारी वृतसेवा : आधुनिक दंत वैद्यकशास्त्रात कृत्रिम दंत रोप-णाच्या माध्यमातून गमावलेल्या दातांचे तसेच संपूर्ण मुखाचे पुनर्वसन करणे शक्य झाले आहे. या उपचार-पद्धतीमुळे रुग्णांचे बोलणे, चावणे, निखळ हास्य व चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभाग प्रमुख डॉ. सुषेन गांजरे यांनी केले.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृत्रिम दंत रोपण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. भूषण बांगर, डॉ. शशी पाटील, डॉ. शितल वाघ, डॉ. बालाजी मुंडे, डॉ. योगेश नागरगोजे, डॉ. प्रणोती चिंचनसुरे, डॉ. शारदा झाडके, डॉ. प्रतिक्षा सोमवंशी हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुषेन गांजरे म्हणाले की, सतत गोड पदार्थांचे सेवन, तंबाखू आणि चुकीच्या दंतसाफाईमुळे दात किडणे, हलणे किंवा गळून पडणे वाढले आहे. यावर उपाय म्हणून आधुनिक दंत उपचारांमध्ये कृत्रिम दात बसवले जातात. डेंटल इम्प्लांट्स पद्धतीमध्ये जबड्यात स्क्रू बसवून पक्के दात बसवले जातात, ज्यामुळे शेज- ारच्या दातांना इजा होत नाही. हे दात नैसर्गिक दातांप्रमाणे कार्य करतात.
डेंटल इम्प्लांट्सविषयी असलेले गैरसमज चुकीचे असून ही उपचार-पद्धती सुरक्षित, दीर्घकाळ टिकणारी व आता परवडणारी आहे. एमआयडीए-सआर दंत रुग्णालय येथे अत्याधुनिक दंत रोपण सुविधा उपलब्ध असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. गांजरे यांनी केले.
यावेळी विविध शैक्षणिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. साबणावर कोरीव काम, स्केच, रील आणि मीम स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी साबणावर कोरीव काम या स्पर्धेत विरनाथ भोजने प्रथम, सिद्दीका शेख व्दितीय, अपेक्षा पाफ तृतीय क्रमांक मिळवला.