रेणापूर (लातूर) : विठ्ठल कटके
रेणापूर तालुका हा नेहमीच टंचाईच्या-छायेत राहिला आहे. मे २०२४ मध्ये तीव्र उन्हामुळे तापमानात वाढ होऊन विहिरी बोअरनी तळ गाठला होता तर रेणा, व्हटी या प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली होती. पाझर तलाव व बॅरेजेस तर कधीच कोरडे पडले होते. त्यामुळे तालुक्यातील १० गावांची भुजल पातळी खालावली होती मागील पाच - सहा वर्षाच्या तुलनेत ती २.६१ मिटर इतकी झाल्याचा मार्च महिन्यातील भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचा अहवाल होता. परंतु या वर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा १६७.५९ मिमी अधिक पाऊस झाल्यामुळे रेणापूर तालुक्याची भूजल पातळी २. ४९ मिटरने वाढल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरून दिसून येत आहे. या वर्षी पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
रेणापूर तालुक्यात गेल्या कांही वर्षातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता दरवर्षी पर्जन्यमान कमी कमीच होत गेल्याचे चित्र दिसत आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर तर होतच होता. परंतु पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे तालुक्यातील जनतेला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे. मे २०२४ महिन्यात भुजल विभागाच्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार रेणापूर तालुक्यातील १० गावे अतिशोषीत म्हणून घोषीत करण्यात आली होती. तीव्र उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता.
तालुक्यातील ज्या ज्या गावांची भुजल पातळी खालावली होती. अशा गावांचा भुजल विभागाने अटल भूजल योजनेत सामावेश केला होता. तसेच अतिशोषीत गावात पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याचे काम भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातुन करण्याची मागणी केली जात होती. तसेच लहान - लहान ओढे, नाले, पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांचे पुनर्भरण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी होत होती. परंतु या वर्षी हि अडचण पावसाने दुर झाली असून सध्या तालुक्यातील लहान मोठे तलाव, बॅरेजेस, शेततळी पाण्याने भरून आहेत. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी सध्याची स्थिती आहे. वर्षी तीव्र उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता. मागील वर्षी पावसाने तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प, व्हटी प्रकल्प व लघु प्रकल्पातील जल साठ्यात अपेक्षीत वाढ झाली नाही. मात्र त्यानंतर जल स्त्रोतातील पाणी साठा वाढला होता.
वरीष्ट भूवैज्ञानिक विभागाच्या टिमने जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेबर महिन्यात भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी भुजल पाणीपातळी मोजण्यात येते. त्यासाठी रेणापूर तालुक्यातील कांही विहिरी निश्चीत करून या विहिरींचे निरिक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी (२०२४ मध्ये) रेणापूर तालुक्याची भुजल पातळी २.६१ मिटरने घटली होती. परंतु या वर्षी मात्र २.४९ मिटरने त्यात वाढ झाल्याचा भुजल सर्व्हेक्षण विभागाचा अहवाल सांगतो.