रेणापूर : मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी आंदोलने केली. निवडणुकीला उमेदवार उभे करणार, करणार नाही, अशी संदिग्ध भूमिका घेतली; पण आरक्षण कसे देणार हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी केले. शरद पवार हे 40 वर्षांपासून राजकारणात असूनही बारामतीचाच विचार करतात, असा आरोप ठाकरे यांनी केला.
माझ्या हातात सत्ता द्या. आरक्षणाविना सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादनही त्यांनी रेणापूर येथे सभेत केले. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचा जन्म झाला. शरद पवार यांना धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या होत्या. यातून लोकांना बाहेर कसे काढायचे; मग जातीचे राजकारण सुरू झाले. प्रत्येकाला आपली जात प्रिय असते; पण दुसर्याच्या जातीबद्दल द्वेष करणे हे चुकीचे आहे,असे ते म्हणाले.