Latur Shivankhed incident tractor arson case
चाकूर : तालुक्यातील शिवनखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली उभा केलेले ट्रॅक्टर जाळल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.११) पाच वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाकूर तालुक्यातील कवठाळी येथील शेतकरी ज्ञानोबा लक्ष्मण बुड्डे यांच्या शिवनखेड येथील शेतात चिंचेच्या झाडाखाली लावलेला (एमएच २४ बीआर १०७४) ट्रॅक्टर अज्ञाताने खोडसाळपणाने जाळून टाकला. शेतकऱ्याचे अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी ज्ञानोबा लक्ष्मण बुड्डे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिरीष नागरगोजे करीत आहे.