Pudhari Talent Search exam pudhari photo
लातूर

Pudhari Talent Search exam : दुसरा दिवसही उत्साह अन्‌‍ उत्स्फूर्ततेचा

रेणापूर येथे पुढारी टॅलेंटचे स्वागत, गुरुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

रेणापूर : पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची कार्यशाळा 6 मार्च रोजी येथील रेणुका पब्लिक स्कूल येथील शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहात पार पडली. पुढारीच्या या बांधिलीचे उपस्थितांनी स्वागत केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणुका पब्लिक स्कूलचे प्राचार्य बाबासाहेब बरीदे हे होते. पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन लहाने , साधन व्यक्ती व्यंकोबा खंदाडे , दै.पुढारीचे वितरण व जाहिरात व्यवस्थापक राजाभाऊ जाधव , रेणापूर तालुका प्रतिनिधी विठ्ठल कटके आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

जि.प. प्रा. शाळा आरजखेडा उमाकांत कोंपले यांनी बुद्धिमता या विषयावर, रामवाडी - कोष्टगाव शाळेचे विलास यादव यांनी इंग्रजी , बीटरगाव शाळेचे दिपक क्षीरसागर यांनी गणित व इनामवाडी शाळेचे बाबासाहेब इंगळे यांनी मराठी या विषयावर तज्ञ शिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.प्राचार्य बाबासाहेब बरीदे यांनी दैनिक पुढारीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उचलले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे तसेच हा उपक्रम विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक पाया भक्कम करणारा असल्याचे सांगितले.

विस्तार अधिकारी सुदर्शन लहाने यांनी पुढारीचा या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी उपलब्ध झाल्याचे सांगून हा आगळावेगळा उपक्रम मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षेबाबत साधन व्यक्ती व्यंकोबा खंदाडे, उमाकांत कोंपले , विलास यादव, दीपक क्षीरसागर , बाबासाहेब इंगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजाभाऊ जाधव यांनी केले, गटसाधन व्यक्ती व्यंकोबा खंदाडे यांनी प्रास्ताविक केले.

सूत्रसंचालन बाबासाहेब इंगळे यांनी करून विठ्ठल कटके यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दैनिक पुढारी लातूरचे वितरण व जाहिरात व्यवस्थापक राजाभाऊ जाधव,प्राचार्य बाबासाहेब बरीदे त्यांचा स्टाफ, गटशिक्षणाधिकारी भराडिया, तालुका गट साधन केंद्र आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी रेणुका पब्लिक स्कूलचे प्रा. शिवराज मोटेगावकर, मीनलताई मोटेगावकर यांनी सर्वोतोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे तसेच याकामी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पुढारी समूहाच्या वतीने आभार मानण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT