लातूर

लातुरातील ट्यूशन परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

backup backup

लातूर, पुढारी वृतसेवा : येथील ट्यूशन परिसरात सुरू असलेल्या अवैद्य व असामाजिक प्रकारास पायबंद घालण्यासाठी व यासंबधीच्या लोकांवर जरब बसवण्यासाठी लातूर पोलिसांच्या वतीने मंगळवारी (दि.21) अचानक कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान सुमारे 250 खटले दाखल करण्यात आले.

नशेच्या गोळ्या विकणे, जबरीने मोबाईल हिसकावणे, चो्रया करणे, दादागिरी करणे, मुलींची छेड काढणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवत सुसाट वेगात दुचाकी चालवणे तसेच विनाकारण फिरत राहणे आदी प्रकार या परिसरात घडत आहेत. ही बाब गांर्भीयाने घेत पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. लातूर शहरातील पोलिसांनी एकत्रित येत ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक तसेच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पाच ते रात्री 9 वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. या दरम्यान एम व्ही अॅक्टच्या 188 केसेस व 1 लाख 37 हजार रुपयाचा दंड करण्यात आला. कलम 110/117 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे 32 खटले दाखल करण्यात आले. कोप्ता अँक्टनुसार 30 खटले चालान कारवाई करण्यात आली.

कार्यवाही दरम्यान 04 पोलीस निरीक्षक, 09 सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच , 102 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी यात सहभाग घेतला होता. ट्युशन परिसरातील या कारवाईने या भागात गुंडगिरी तसे्च अवैद्य व्यवसाय करणा्रयांचे धाबे दणाणले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT