Latur Crime News : वाळूच्या पैशातून परळीच्या तरुणाचा लातुरात खून file photo
लातूर

Latur Crime News : वाळूच्या पैशातून परळीच्या तरुणाचा लातुरात खून

चाकू व फरशीने हल्ला; एक गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Parli youth murdered in Latur over sand money dispute

लातूर, पुढारी वृत्तसेवा व्यवसायातील पैशाच्या कारणावरून परळी येथील तरुणाचा लातूर शहरातील उस्मानपुरा भागात एका हॉटेलसमोर निघृण खून करण्यात आला. हॉटेसमोर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिघांनी कोयता, चाकू व फरशीच्या तुकड्याने केलेल्या हल्ल्यात मन्सूर अली शेख लायकअली (रा. उसिफिया कॉलनी, परळी) याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मजहरखान नादरखान पठाण गंभीर जखमी झाला.

मन्सूर अलीसह परळीतील काही तरुण जेवणासाठी हॉटेलात आले होते. जेवण सुरू असताना त्यांच्यात वाद झाला. हॉटेलचालकांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर हॉटेलसमोरच पुन्हा वाद उफाळला. यावेळी अल्ताफखान सरदारखान पठाण याने कोयत्याने, खालेद हमीद शेख याने फरशीच्या तुकड्याने, तर उमर महबूब शेख याने चाकूने मन्सूर अलीवर हल्ला केला.

गंभीर जखमी झालेल्या मन्सूर अलीचा मृत्यू झाला. मजहरखान पठाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींपैकी एकजण परळी नगर परिषदेचा नगरसेवक असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाळू व्यवसायातील पैशाच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची प्राथमिकमाहिती असून, हल्ल्याचे पूर्वनियोजन होते का, याचा पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT