लातूर : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणातील एक ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व होते. जे आज आपल्यात नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी लातूर येथे चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानी येऊन शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मध्यमाशी बोलताना त्यांनी, लोकनेते गोपीनाथराव मुंडे व दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते.
मुंडे साहेबांच्या पश्चातही चाकूरकर आमच्या परिवाराशी कायम राहिले असल्याचे नमूद केले. राजकारणातील ऋषितुल्य नेता, अनुभवी नेता ज्यांनी आपलं जीवन व कारकेत सुंदर केली असे शिवराज पाटील चाकूरकर आदर्श नेते होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.