निलंगा : निलंगा तालुका जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सोमवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतमोजणीत एकूण 10 जिल्हापरिषद गटापैकी भाजपाला चार, काँग्रेस तिन, शिवसेना शिंदे गट एक , राष्ट्रवादी अजित पवार गट एक व अपक्ष एक उमेदवार विजयी झाले आहेत. तर 20 पंचायत समिती गणापैकी भाजपाचे 13 उमेदवार तर काँग्रेसचे 7 उमेदवार निवडून आले असून निलंगा पंचायत समिती हे पुन्हा भाजपच्या ताब्यात गेली आहे.
गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत 9 जिल्हा परिषद गटातून 8 भाजपचे तर 1 काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. आणि 18 पंचायत समिती गणातून 16 भाजपचे तर 2 काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. निलंगा तालुक्यात भाजपला बहुमत मिळाले होते. पंचायत समिती भाजपच्या ताब्यात होती.
त्यानंतर तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या अटीटतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीत जि.प चा एक गट वाढल्याने 10 जि.प गट व पं.स. चे दोन गण वाढल्याने 20 पं.स. झाले. त्यात शनिवारी 7 रोजी झालेल्या निवडणुकीत व 9 रोजी झालेल्या मतमोजणीत 20 जिल्हा परिषद पैकी चार भाजपचे, तीन काँग्रेस, एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक शिवसेना शिंदे गट, एक अपक्ष उमेदवार निवडून आले.तर 20 पंचायत समिती पैकी 13 भाजपचे तर 7 काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या निटुर जिल्हा परिषद गटात 34 वर्षानंतर भाजपाचे रोहित पाटील यांनी काँग्रेसचे सुरेंद्र धुमाळ यांना पराभूत करून सर्वाधिक मताने निवडून आले. अंबुलगा गटातून भाजपाचे चंद्रकांत होरे ,औराद शहाजानी गटात काँग्रेसच्या योगिता जाधव, मदनसुरी गटात शरयू माने ,कासार शिरशी गटामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमाजी उमापुरे , तांबाळा गटामध्ये अपक्ष उमेदवार मीरा तुबाकले विजयी झाल्या.
सरवडी गणातून भाजपाच्या दीपा इंगळे यांनी काँग्रेसच्या पाटील राऊ यांना पराभूत करत केवळ दोन मतांनी विजयी झाल्या. निलंगा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये निकालानंतर काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांच्या निलंगा शहरातून ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली.