Latur family dispute Chakur attack case
चाकूर : कौटुंबिक वादातून भाच्याने मामावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना येथील जुने बसस्थानक अण्णाभाऊ साठे चौकात आज (दि.१२) दुपारी २ च्या सुमारास घडली. पोलिसांनी भाच्यास ताब्यात घेतले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, चाकूर येथील जुने बसस्थानक अण्णाभाऊ साठे चौकात फुलांचा व्यावसाय करणारे तुकाराम ज्ञानोबा फुलारी (वय ४२) हे आज दुपारी दुकानात बसले असताना त्याचा भाचा (नाव माहित नाही) याने माझ्या पत्नीस घरी यायला सांगा, म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून चाकूने मारहाण केली आहे.
या मारहाणीत तुकाराम फुलारी जखमी झाले. त्यांच्यावर चाकू हल्ला करताना त्याठिकाणी त्यांचा मुलगा रोहन फुलारी आणि मेहुणे आनंद वैजनाथ फुलारी सोडवायला जाताच त्यांनाही चाकूने मारहाण केली. जखमी तिघांवर चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. चाकूर पोलिसांत या घटनेची नोंद झाली नव्हती.