NEET Paper Leak: Inquiry into Private Coaching Classes in Latur
लातूर, पुढारी वृतसेवा नीट यूजी परीक्षेत विचारण्यात आलेल्या एकूण प्रश्नांपैकी ४२ प्रश्न हे लातूर येथील एका खासगी क्लासेसने घेतलेल्या सराव परीक्षेतील जसेच्या तसे आले असल्याची तक्रार मंगळवारी (दि.१२) रात्री एका पालकाने पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे केली. त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
बुधवारी विद्यार्थ्यांसह क्लासमधील कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदवण्यात आले असल्याची याबाबत काही माहिती पोलिस अधीक्षक तांबे व या प्रकरणाचे तपास अधिकारी डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी दिली.
देशात नीट पेपर फुटीचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. दरम्यान मंगळवारी लातूर येथील पालकाच्या तक्रारीनंतर बुधवारी लातूर पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांचे व क्लासमधील कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदवले. तसेच संबंधित क्लासचालकांचे म्हणणे जाणून घेतले. याशिवाय क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.