Renapur livestock vaccination pudhari photo
लातूर

Renapur livestock vaccination : रेणापूर तालुक्यात पशुधन संरक्षणासाठी व्यापक लसीकरण

24 हजार गायी-म्हशी,28 हजार शेळ्या-मेंढ्यांना लसीचे कवच; लम्पीचीही लस देण्यात येणार : डॉ. पडगलवार

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल कटके

रेणापूर : रेणापूर तालुक्यात 20 व्या पशुगणनेनुसार एकुण 47 हजार 199 पशुधनांची संख्या असुन त्यातील गायवर्गीय , म्हैसवर्गीय 24 हजार 95 जनावरांना तर 28 हजार 200 शेळ्या - मेंठ्यांना मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आले आहे. तसेच माहे फेब्रुवारी 26 मध्ये 29 हजार 450 जनावरांना लाळ खुरकुताची लस देण्यात आली आहे.

पुढील काळात जनावरांना लंम्पी चर्मरोगाची लागण होऊ नये यासाठी लवकरच हि लस प्राप्त होणार आहे त्याचेही लसीकरण केले जाणार आहे असे रेणापूर तालुका पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राघवेंद्र पडगलवार यांनी सांगितले.

मागील काळात रेणापूर तालुक्यात 46 हजार 591 जनावरांना लंपी त्वचारोगावर ( लंपी स्कीन डीसीज ) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले होते.त्यातहि 44 पशुंना या रोगाची लागण झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या वर्षीही सर्वच जनावरांना लंम्पी चर्मरोगाची लस दिली जाणार आहे.

पशुसंवर्धनासाठी तालुक्यात एक तालूका लघु पशु सर्व चिकित्सालय , वर्ग 1 चे दोन तर वर्ग 2 चे सहा असे नऊ पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत आहेत. मागील काळात तालुक्यात 44 जनावरांना लंपी त्वचारोगाची ( लंपी स्कीन डीसीज ) लागण झाल्यामुळे पशु वैद्यकिय विभाग खडबडुन जागा झाला होता. तर पशुपालकही घाबरून गेले होते.

बाधीत व अबाधित पशुधनास तातडीने प्रतिबंधात्मक लसीकरण करून लंम्पी चर्मरोगाची लागण आटोक्यात आणली होती. विविध पथकांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव , शेत व तांडे - वाड्यावर जावुन जनावरांना लंपी त्वचारोगाच्या प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण करण्यात आले होते.

तातडीने लसीकरण केल्यामुळे या रोगाची लागण आटोक्यात आणता आली. शिवाय पशुधनांच्या मृत्युचे प्रमाणही रोखता आले. जनावरांना रोग होणार नाहित यासाठी पशुवैद्यकिय अधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष ठेवुन आहेत. या उपरही जनावरांना ताप येणे , अंगावर गाठी येणे, नाका - डोळ्यातुन पाणी गळणे , जनावरांच्या पायावर सुज येणे व लंगडने अशी लक्षणे दिसल्यास पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पडगलवार यांनी केले आहे.

जनावरांच्या लाळ , घटसर्प व खुरकुतासाठी 13 हजार 50 लस प्राप्त झाली होती त्यातील 12 हजार 451 पशुंना लस देण्यात आली. फर्या रोगाची 12 हजार 250 लसमात्रा प्राप्त झाली होती त्यातील 11 हजार 644 पशुंना लस देण्यात आली.

तसेच 30 हजार 300 शेळ्या - मेंढ्यांच्या आंतृविशार रोगांची लस प्राप्त झाली होती त्यातील 28 हजार 200 लस मात्रेचा वापर करण्यात आला आहे. वरील सर्व रोगांसाठी जनावरांना दरवर्षी लसीकरण केले जाते. शिवाय कृत्रीमरेतन , वंध्यत्व , गर्भ तपासणी , बेरड वळूंचे खच्चीकरण व इतर रोगावरही मोफत औषधोपचार केले जातात. असे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राघवेंद्र पडगलवार यांनी सांगितले.

  • रेणापूर तालुक्यात 20 व्या पशुगणनेनुसार गायी - म्हशींची संख्या 47 हजार 199 एवढी नोंद झाली आहे. त्यात गायी - 11 हजार 900 , बैल - 11 हजार 938 , म्हैशी - 21 हजार 931 , रेडे - 1 हजार 430 , शेळ्या - 11 हजार 757 , बोकड - 2 हजार 782, मेंढ्या - 1 हजार 416 , मेंढा - 298, वराह 205 अशा जनावरांची नोंद झाली आहे. 11 प्रगणक व 3 पर्यवेक्षांनी 21 वी पशुगणना पूर्ण केलेली आहे परंतु त्याचा अंतिम अहवाल मात्र अद्याप प्राप्त झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT