Latur udgir gram panchayat sarpanch reservation draw 
लातूर

Latur udgir gram panchayat sarpanch reservation draw| उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर

Latur | कंहीं खुशी कहीं गम, २०२५-२०३० साठी आरक्षण निश्चित - अनुसूचित जाती २२, अनुसूचित जमाती २, नामाप्र १९, खुला ४४

पुढारी वृत्तसेवा

उदगीर :उदगीर तालुक्यातील एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत सोमवारी, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कै. मलशेट्टीआप्पा पाटील नागराळकर पंचायत समिती कार्यालय, उदगीर येथील सभागृहात पार पडली.

यापूर्वी प्रवर्गनिहाय आरक्षणाची संख्या ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक निश्चित झाल्याने शासनाने सुधारित अधिसूचना काढून अनुसूची-ब व अनुसूची-क अन्वये सुधारित आरक्षण संख्या निश्चित केली होती. त्यानुसारच आजची सोडत घेण्यात आली.सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत घेण्यात आली. तालुक्यातील सर्व ८७ ग्रामपंचायतींचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवर्गनिहाय आरक्षणाचा तपशील -

अनुसूचित जाती - एकूण २२

महिला - ११ धडकनाळ, कल्लूर, चांदेगाव, शेलाळ, मादलापूर, करखेली, हिप्परगा (डावूळ), चांडी, निडेबन, बामणी, तादलापूरसर्वसाधारण - ११ सताळा (बु), तुडुंचर, इटमालपूर, अरसनाळ (महानगांव), सुकणी, जकनाळ, शेकापूर, कौळखेड, जानापूर, कनीयळादेवी, देवजण

अनुसूचित जमाती - एकूण महिला - १ :उमरगा मन्ना सर्वसाधारण - १ :खेरडा खु.नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) - एकूण १९ महिला - ९ आवलकुडा, कुमठा खु., आडोळवाडी, देऊळवाडी (मुर्तलगाव), तुडार, कुमदाळ, एकुरकारोड, मांजरी, बनशेळकी सर्वसाधारण - १० : करवंदी, होनहिप्परगा, डुगरशेळकी, रावणगांव, धुडीहिप्परगा, वायगांव, लोणी, चिमाचीवाडी, चिघळी, टाकळी (वागदरी)खुला प्रवर्ग - एकूण ४४ महिला - २२ हाकनकवाडी, दावणगाव, कुमदाळ (उ), हाळी, बेलसकरगा, कोदळी, मलकापूर, गुरधाळ (उ), लंबगाव, मोतळवाडी (हाळी, वंजारवाडी), शंभुउमरगा (महादेववाडी), नागलगांव (सोमला काशीराम तांडा, मोतळतांडा, मारोतीतांडा), वाडी, कासराळ, गुडसुर, हंडरगुळी, सुमठाणा, वाढवणा (बु), शिराळ (जा), पिंपरी, डाऊळ (हिप्परंगा), वाढवणा (खु)

सर्वसाधारण - २२ करडखेल, शेफळ, गंगापूर, डांगेवाडी, डडस, तोगरी, नळगीर, माळेवाडी, मोघा, येणकी, वागदरी, लोहारा, सोमनाथपूर, हैबतपूर, हेर, बोरगाव (बु), नेगाव, भाकसखेडा, मल्लापूर, हंगरगा, तिवटयाळ, नावंदी गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावोगावी राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्या गावात महिला आरक्षण, कोणत्या गावात सर्वसाधारण आरक्षण आले यावरून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. विशेषतः मल्लापूर, गुरधाळ, कुमदाळ या गावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मल्लापूर व गुरधाळ (उ) हे खुला सर्वसाधारण / खुला महिला मध्ये गेले असून कुमदाळ हे नामाप्र महिला मध्ये गेले आहे.

तहसीलदार राम बोरगावकर यांनी सांगितले की, सदर कार्यक्रमाची माहिती सर्व संबंधित ग्रामपंचायतींमधील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत अधिसूचनेची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT