लग्नाच्या शुभमुहूर्तावर आधी लोकशाहीला मानाचा मुजरा ! file photo
लातूर

लग्नाच्या शुभमुहूर्तावर आधी लोकशाहीला मानाचा मुजरा !

नवरदेवाने लग्नाआधी लोकशाहीला वंदन केलेल्या या घटनेची माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रा. डॉ. जे. एल. जायेवार यांच्याकडून प्राप्त झाली.

पुढारी वृत्तसेवा

latur The groom exercised his right to vote before the wedding

जळकोट पुढारी वृत्तसेवा आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असलेल्या स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही लोकशाहीप्रति आपले कर्तव्य विसरले नाही, असे प्रेरणादायी उदाहरण उमरदरा (ता. जळकोट येथील शिवहार बाबाराव गित्ते यांनी घालून दिले.

आज त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात असतानाही त्यांनी सर्वप्रथम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. नवरदेवाने लग्नाआधी लोकशाहीला वंदन केलेल्या या घटनेची माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रा. डॉ. जे. एल. जायेवार यांच्याकडून प्राप्त झाली.

लग्नाची लगबग, नातेवाईकांची गडबड आणि मंगल वातावरण यामध्येही शिवहार गित्ते हे थेट उमरदरा येथील मतदान केंद्रावर पोहोचले. स्वतःचा आनंद महत्त्वाचा असला तरी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हे सर्वोच्च कर्तव्य आहे, या भावनेतून त्यांनी आपले मतदान केले आणि त्यानंतर विवाह समारंभाकडे प्रस्थान केले.

मतदानानंतर फकिरदरावाडी (ता. कंधार जि. नांदेड) येथील संभाजी बापुराव केंद्रे यांची सुकन्या व नियोजित वधू सविता यांच्याबरोबर शिवहार यांचा आज शनिवारी सकाळी ११. ५० वाजता विवाह संपन्न झाला. त्यांच्या या कृतीने परिसरातील नागरिक भारावून गेले असून युवकांसाठी हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. एका हातात आयुष्याच्या नव्या प्रवासाचे स्वप्न आणि दुसऱ्या हातात लोकशाहीप्रति जबाबदारी अशा भावनिक क्षणाचे साक्षीदार आज उमरदरा गाव बनल्याचा साक्षात्कार सर्वांना आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT