नदीकाठची गावे जलमय झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. Pudhari
लातूर

Shirur Anantpal Taluka flood | शिरूर अनंतपाळ तालुक्यात महापुराचा कहर; नदी-नाले ओसंडले

Latur heavy rain | गावांमध्ये शिरले पाणी, जनजीवन ठप्प

पुढारी वृत्तसेवा

Shirur Anantpal Taluka flood

शिरूर अनंतपाळ: शिरूर अनंतपाळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे घरणी, लेंढी, कोटकसर, मांजरा या प्रमुख नद्या तसेच नाले, ओढे यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून तालुक्यात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले ओसंडून वाहू लागले असून, काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या एक किलोमीटर बाहेरून वहात आहे. त्यामुळे नदीकाठची गावे जलमय झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

साकोळ, मसणजोगी वस्तीत पाणी शिरले असून, मज्जिद, अंगणवाडी, देवळे, घरे यासारख्या सार्वजनिक ठिकाणेही पाण्याखाली गेली आहेत. अनेक लहान पुलं पूर्णतः पाण्याखाली गेले असून, साकोळ होनमाळ लक्कडजवळगा नागेवाडी हणमंतवाडी धामणगाव कारेवाडी चाबरगा गावांचा संपर्क तुटला आहे.

पूरस्थितीमुळे ऊस, सोयाबीन, तुर, भुईमुग, उडीद, मुग, साळ यासारखी खरीप पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांनी आधीच रोजगारांना सोयाबीन काढण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली होती, मात्र पाण्यामुळे मोटार, पाईप अशा यंत्रसामग्रीचा उपयोगही शक्य होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT