Crime News  pudhari
लातूर

Latur crime : शेलदरा येथे शेत मोजणीच्या वादातून मारहाण, वृद्ध शेतकरी जखमी

जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळकोट : शेलदरा (ता. जळकोट ) येथील शिवारात शेत मोजणीच्या कारणावरून वादावादी झाली. या वादातून एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली असून शेतकरी जखमी आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १.३० च्या सुमारास शेलदरा शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बालाजी बापुराव काकडे (वय ६५, व्यवसाय – शेती, रा. येवरी, ता. जळकोट) हे शेत मोजणीच्या कामासाठी शेतात उपस्थित होते. जळकोट पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या समक्ष भूमी अभिलेख कार्यालय, जळकोट येथील अधिकारी व कर्मचारी हे शेतमोजणी करुन देत होते. यावेळी आरोपींनी बालाजी काकडे यांच्याशी वाद घालत मारहाण केली.

या प्रकरणात एकूण ८ आरोपींचा समावेश असून त्यात गोपाळ व्यंकटराव उर्फ बाबुराव हासुळे, व्यंकटराव ऊर्फ बाबुराव विठ्ठलराव हासुळे (रा. शेलदरा) अंबादास माने, धीरज माने, आकाश माने ( रा. हावरगा), यादव श्रीराम (रा. सोरगा) , बब्रुवान पाटील आणि भगवान पाटील (रा. हसरणी ता. अहमदपूर) यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी एकत्र येत फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुख्य आरोपी गोपाळ व्यंकटराव ऊर्फ बाबुराव हासुळे यांनी दगडाने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच, फिर्यादीला जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार हे याबाबत तपास करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT