Latur Police workshop on digital banking fraud
निलंगा, पुढारी वृत्तसेवा: पोलीस उपविभाग निलंगा अंतर्गत येणाऱ्या निलंगा, देवणी, औराद शहाजनी, कासार सिरसी येथील तपासीक पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या साठी बैंक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्यास प्रतिसाद मिळाला, निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात या कार्यशाशेचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयसीआयसीआय बँकेचे पुणे येथील सुमित महाबळेश्वरकर, लिलेष भगत उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बी. एस. गायकवाड व उप प्राचार्य प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बँक फ्रॉड व डिजीटल बँकींग फ्रॉड संदर्भातील गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रीक व कायदेशीर स्वरुपाच्या आडचणीवर कशा प्रकारे मात करावी याबाबत सुमित महाबळेश्वरकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयसीआयसीआय निलंगा शाखेचे बँक व्यवस्थापक अभिजीत मंगरुळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शेषेराव माने, महादेव भुतमपल्ले, युवराज पेठकर यांनी परिश्रम घेतले. आभार सपोनी विठ्ठल दुरपडे यांनी मानले.