उदगीर : उदगीर शहरातील मोंढा परिसरात महादप्पा शांतप्पा मुद्दा यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत जुगार खेळत असलेल्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नगदी रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहन असा एकूण दहा लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवारी रात्री ९:४५ वाजता उदगीर शहर पोलिसांना गुप्त पोलिसांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. यावेळी उदगीर शहर पोलिसांनी उदगीर शहरातील मार्केट यार्डातील, महादप्पा शांतप्पा मुद्दा यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत अंधर बाहर नावाचा जुगार खेळत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि ९ जणांना अटक केली. आरोपींची नावे प्रदिप हाणमंतराव कावठाळे ( वय-४९ वर्ष, रा. संतोषीमाता नगर ), उदगीर नागेश काशिनाथ आंबेगावे (वय-३२ वर्ष, रा. बनशेळी, ता. उदगीर) राम विजयकुमार बिरादार (वय-३८ वर्ष, रा. माळेवाडी, ता. उदगीर), संजिव उत्तमराव कासले (वय-४३ वर्ष, रा. शेकापुरवाडी, ता. उदगीर), ओमकार बळिराम कंटे (वय-२३ वर्ष, रा. तोंडार, ता. उदगीर) प्रमोद प्रकाश देशमुख (वय- ३१ वर्ष, रा. निडेबन, ता. उदगीर), शैलेश वैजनाथ लिंबाळे (वय-२९ वर्ष, रा. तोंडार, ता. उदगीर), वैजनाथ ओमकार स्वामी (वय- ३५ वर्ष, रा. माळेवाडी, ता. उदगीर), संकेत श्रीकांत बिरादार (वय- २९ वर्ष, रा. बनशेळकी, ता. उदगीर) अशी आहेत.
उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई
पोलिसांनी या कारवाईत नगदी रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहन असा एकूण दहा लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हालदार हारणे यांच्याकडे देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.