पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचे लातुरात छापे File Photo
लातूर

Latur crime : पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाचे लातुरात छापे

गुटखा, मटका कारवाईत 91 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

लातूर: नांदेड परिक्षेत्रातीचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने लातूरमध्ये अवैध व्यवसायांवर छापे टाकले व 91 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 13 जणांवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

लातूर शहरातील करीम नगर येथील घरात छापा टाकून 69 हजार 485 किमतीचा गुटखा जप्त केला गेला. या प्रकरणी इम्रान इसाक पठाण यांच्याविरुद्ध विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच पथकाने आमलेश्वर नगर, एम.आय.डी.सी पोलीस हद्दीत मटका जुगारावरही कारवाई करून 21 हजार 690 किमतीची रोकड व मोबाईल जप्त केले.

या प्रकरणात 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 91 हजार 175 किमतीचा मुद्देमाल जप्त झाला असून, या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकातील अधिकारी व अंमलदारांचे पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यास अथवा पोलिस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या परपवशवीरपसश.ारहरेिश्रळलश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या ‌‘खबर‌’ हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT