Latur crime  file photo
लातूर

Latur | निलंगा येथे आयपीएल सट्टा जुगारावर छापा

निलंगा येथे आयपीएल सट्टा जुगारावर छापा

पुढारी वृत्तसेवा

लातूर - आयपीएल क्रिकेट सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लखन ऊर्फ बाबा महापु कांबळे (वय २९) आणि पवन दयानंद कांबळे (वय २६) अशी आरोपींची नावे असून दोघेही निलंगा येथील रहिवासी आहेत ११ एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्व ाखालील पथक निलंगा परिसरात गस्त घालत असताना त्यांना दादगी ते भंगार चिंचोली रोडवरील दादगी शिवारात काही व्यक्ती आयपीएल सामन्यावर सट्टा चालवत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यावरून पथकाने तत्काळ तेथे छापा टाकून उपरोक्त आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता सहा मोबाईल फोन, सट्टा व्यवहाराची नोंद असलेली कागदपत्रे, एक बॉलपेन आणि एक होंडा अॅक्टिव्हा स्कूटर असा एकूण ४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर फोनद्वारे सट्टा स्वीकारत असल्याचे निष्पन्न झाले. ते मुंबईतील एका बुकीसाठी काम करत असून, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रोजचा सट्टा त्याच्याकडे पाठवत होते. या बदल्यात त्यांना दहा टक्के कमिशन मिळत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य बुकीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT