Latur Outer Ring Road : लातूर आऊटर रिंगरोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा file photo
लातूर

Latur Outer Ring Road : लातूर आऊटर रिंगरोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

४-लेन कॉरिडॉर म्हणून विकास होणार : आ. अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना यश

पुढारी वृत्तसेवा

Latur Outer Ring Road Granted National Highway Status

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर शहराच्या भविष्यातील नियोजित विकासाला गती देणाऱ्या आणि शहरवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागणीतला महत्त्वाचा प्रकल्प लातूर आऊटर रिंगरोड आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी, झपाट्याने होणारा शहरी विस्तार, औद्योगिक व व्यापारी क्षेत्राचा वाढता भार आणि भविष्यातील दळणवळणाच्या गरजा लक्षात घेता, 'पेठ चांडेश्वर कव्हा बाभळगाव भातखेडा खुलगापूर नांदगाव रायवाडी हरंगुळ खंडापूर गंगापूर पेठ' या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या आऊटर रिंगरोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकल्पासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मागील अनेक महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. गेल्या दिवाळीदरम्यान त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रस्ताव सविस्तर मांडला. लातूर शहराच्या वाढत्या गरजा आणि प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रीांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याद्वारे आवश्यक प्रस्ताव सादर करण्यास सूचना दिल्या होत्या.

याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लातूरच्या विकासासाठी या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचा आश्वासन दिले होते. आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सादर केलेला प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पोहोचला असून, मंजुरी मिळाल्यानंतर हाप्रकल्प राबविला जाईल.

दरम्यान, लातूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरात लवकर केंद्रीय मंजुरी मिळावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील असे सांगत आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरकरांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

आऊटर रिंगरोड प्रकल्प राबवल्यामुळे लातूर शहरातील वाहतूककोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होईल, बाहेरील जड वाहतूक थेट मार्गान वळवता येईल, अपघातांचा धोका कमी होईल तसेच शहरवासीयांना सुरक्षित आणि सुलभप्रवासाची सुविधा मिळेल. याशिवाय, या प्रकल्पामुळे लातूरच्या औद्योगिक, व्यापारी व निवासी क्षेत्राचा विस्तारही सुलभ होईल, शहर नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होईल आणि लातूरच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल.
- आ. अभिमन्यू पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT