निलंगा : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांचा पूर आला आहे. पूराच्या पाण्यात २ शेतकरी वाहून गेले. शेताकडे गाय घेऊन जाताना काटेजवळगा गावाजवळ ही घटना घडली. यामधील एकजणाला शोधण्यात यश आले असून, आणखी १ जण बेपत्ता असल्याचे समजते. एनडीआरएफच्या पथकाकडून एकाचा शोध सुरू आहे.
निलंगा येथील ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात दोघे वाहून गेल्याची घटना रविवारी (दि. २१) सकाळी सहाच्या सुमारास घडली. यामध्ये एकजण बचावला तर एक बेपत्ता आहे. बेपत्ता शेतकऱ्यांना शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
तालुक्यात पावसाने झोडपले असून पावसाचा कहर झाला आहे. लाबोंटा, काटेजवळगा यासह अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे तर काही ठिकाणी घराची पडझड झाली आहे. काटेजवळगा (ता. निलंगा) येथील वैजनाथ श्रीपती राजमाने (वय-५०) व दयानंद संभाजी बोयणे (वय-४५) हे दोघे शेताकडे सकाळी गाय घेऊन जात असताना रेड्डी यांच्या शेताजवळील ओड्याला मोठा पूर आला होता.
लाबोंटा, काटेजवळगा, हलगरा, अन्सारवाडा, मदनसुरी यासह अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी घराची पडझड झाली आहे. काटेजवळगा तालुका निलंगा येथील वैजनाथ श्रीपती राजमाने व दयानंद संभाजी बोयणे हे दोघे शेताकडे सकाळी गाय घेऊन जात असताना रेड्डी यांच्या शेताजवळील ओड्याला मोठा पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे रस्ता पूर्ण करत असताना दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले. यामध्ये दयानंद बोयणे हे बालबाल बचावले तर वैजनाथ राजमाने हे सकाळपासून बेपत्ता आहेत.
गावातील मुक्कामी असणारी बस गाडी बंद होती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिक या वड्याच्या ठिकाणी जमा झाले होते. परंतु त्यांचा पत्ता लागला नाही दोघांपैकी एकाचे प्राण वाचले असून दुसरा बेपत्ता आहे. याबाबत एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचून खरिप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे त्यामुळे या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.