जळकोट : पाटोदा बु. ( ता. जळकोट ) येथून मोटारसायकलने जळकोटकडे निघालेल्या दोन तरुणांचा त्यांची मोटारसायकल राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला धडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. चालकाचा मोटारसायकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाटोदा बु. ते जळकोट दरम्यान आज ता. 2 रोजी सायंकाळी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा बु. येथून जळकोटकडे येत असताना मोटारसायकवरील रामेश्वर माधव गोरखे वय वर्षे २४ रा. पाटोदा बु. (ता.जळकोट) व गिरिष बालाजी कांबळे वय २६ वर्ष रा. नळेगाव (ता. चाकूर ) यांचा मृत्यू झाला आहे. पाटोदा बु. जवळील पुलावर मोटारसायकवरील ताबा सुटल्याने पुलाच्या धडकेत गिरिष कांबळे हा जागेवरच मृत्यू पावला.
तर रामेश्वर गोरखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच जळकोट पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण हे करीत आहेत. रामेश्वर व गिरिष हे आई वडिलाला एकटेच होते अशी माहिती मिळाली. रामेश्वर हा जळकोट येथे मोटारी दुरुस्ती करण्याचे काम करीत होता. तर गिरिष हा काही कामानिमित्त पाटोदा बु. आजोळी राहत होता.