निलंगा : तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पमध्ये एका अंदाजे 65 वर्षीय व्यक्तीचा प्रकल्पमध्ये पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तुपडी येथील पोलीस पाटील यांनी निलंगा पोलीस ठाणात दिली, सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड व पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरानी सदरील व्यक्तीची तपासणी करून मृत घोषित केले. सदरील मृत व्यक्तीचा उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मयत व्यक्तीची ओळख पडली नसल्याने ओळख पाठवण्याचे काम चालू होते. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निलंगा पोलीस करीत आहे.