sand mining raid
चाकूर : शासन प्रतिबंधित असणाऱ्या येजगी वाळूची क्षमतेपेक्षा जास्त अवैध वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आष्ठामोड ते नांदगावपाटी दरम्यान टोल नाक्यावर शुक्रवारी चाकूर पोलिसांनी पकडल्या. यामध्ये जवळपास १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, चाकूर तालुक्यातील आष्ठामोड ते नांदगाव पाटीजवळील टोल नाक्यावर आरोपी संगनमत करून स्वत:च्या ताब्यातील पांढऱ्या निळ्या रंगाच्या दोन हायवामध्ये (क्रमांक एम एच २४ बी डब्ल्यु ७२०० आणि एम एच २४ बी डब्ल्यु ७७२७) अवैध येजगी वाळूची चोरटी विक्री व्यवसाय करत होता. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करीत असताना या हायवा पकडण्यात आल्या आहेत. दोन जणांना ताब्यात घेतले असून दोघे फरार झाले आहेत.
सिध्देश्वर बाबुराव जाधव स्थागुका लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेरु चांदसाब शेख (वय ३०) रा. रेणापूर, ताजखा खाजाखा पठाण रा. आलमपुरा लातुर गाडी मालक हा फरार आहे. एम एच २४ बी डब्ल्यु ७७२७ चा चालक मोसिन रफिक शेख (वय ३२) रा. पठाण नगर आर्वी ता.जि. लातूर आणि पंकज प्रदीप मोरे रा. आंबाजोगाई रोड खोरे गल्ली लातूर फरार यांच्या विरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि गौण खनिज अधिनियमानुसार चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह. पुढील तपास पोलीस हवालदार शिरीष नागरगोजे हे करीत आहेत.
एक कोटी १० लाख ८४ हजार रूपयाची अवैध येजगी वाळूवर सर्वात मोठी कारवाई चाकूर पोलिसांनी केली असून या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.