लातुरात कारमध्ये सापडला गुटखा, कारसह गुटखा जप्त pudhari photo
लातूर

लातुरात कारमध्ये सापडला गुटखा, कारसह गुटखा जप्त

पुढारी वृत्तसेवा

लातूर, पुढारी वृतसेवा : कारमधे साठवून ठेवेलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व कार असा ३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसारातून जप्त केला. या प्रकरणी अमान जकियोदीन सय्यद, (वय १९) व समीर जकियोदीन सय्यद यांच्या विरुध्द गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पो लेबर कॉलनी परिसरात रोडवर एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये गुटका व तंबाखूजन्य पदार्थ अवैध विक्री व व्यवसाय करण्यासाठी साठवणूक ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

त्यावरुन ती कार पथकाने ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात ४३ हजार ३५० रूपयाचा गुटखा व सुगंधित पानमसाला मिळाला. पथकाने स्विफ्ट कार ही जप्त केली, पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार साहेबराव हाके, संजय कांबळे, मोहन सुरवसे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी ही कार्यवाही केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT