लातूर : लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचाराखाली असलेल्या 'त्या' दोन्ही रुग्णांच्या टूल सॅम्पलचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना जीबीएस नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी दिली.
उपचाराखाली असलेल्या 'या' रुग्णांना जीबीएस चा संसर्ग झाल्याचा संशय होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराच्या परिसरात सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. तथापि, चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने हा संशय दूर झाला असल्याचे तसेच या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.