Cyber Crime  pudhari photo
लातूर

Latur Crime : सायबर भामट्यांचा नवा पॅटर्न; ऑनलाईन लुटीचे ४ लाख ५७ हजाराची रक्कम उदगीरमधील बँकांतून 'चेक'द्वारे वटवली

उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून मिळवलेली तब्बल ४ लाख ५७ हजार ६०७ रुपयांची रक्कम उदगीर शहरातील दोन बँकांमधील खात्यांतून चेकद्वारे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.२२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश दिगांबर खंदाडे (वय ३७) यांनी तक्रार दिली आहे. २५ जून २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत उदगीरमधील दोन बँकांमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला.

नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून आलेली एकूण चार लाख सत्तावन्न हजार सातशे सहा रुपयांची रक्कम ही उदगीर हद्दीतील या दोन खात्यांमध्ये जमा करण्यात आली. त्यानंतर खातेधारक, खाते हाताळणारे आणि चेकद्वारे पैसे काढणारे इसम यांनी सायबर गुन्हेगारांशी संगनमत करून सदर रक्कम चेकद्वारे काढून घेतली. कलम २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा मुख्य हेतू "ऑनलाईन फसवणूक करून चेकद्वारे पैसे काढणे" असा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या पोलीस बँक खात्यांचे व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर व्यवहाराची चाचपणी करत आहेत. खातेधारकांची चौकशी सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेतला जाणार असल्याचे पो ,उ ,प नि रेडेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT