Crime News pudhari photo
लातूर

Latur Crime : वाघोलीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

चाकूर : तालुक्यातील वाघोली येथे अज्ञात चोरट्याने पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ३० सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यानंतर ते १ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत घडली. या घटनेमुळे चाकूर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी वाघोली येथील गंगाधर गहिणाजी केंद्रे यांच्या घराचे चोरट्याने पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले विविध सोन्याचे दागिने तसेच चांदीचे कडे आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४२ हजार ४०० रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मायने, पोलिस निरीक्षक बालाजी भंडे, पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

गंगाधर गहिणाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घरफोडीमुळे वाघोली परिसरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT