POCSO Pudhari
लातूर

Latur Crime |अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, दोन जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उदगीर : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन रत्नागिरी येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर बी ,एन ,एस ,आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

१८/७/२०२६ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा . १५/७/२०२६ रोजी पहाटे १ ते २ च्या दरम्यान लोणी ता. उदगीर येथील राहत्या घरातून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १४/७/२०२६ रोजी दुपारी आरोपी कृष्णा अच्युत फड (वय १८ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला भेटून रात्री १ वाजता महत्वाचे बोलायचे आहे असे सांगितले.

त्याप्रमाणे १५/७/२०२६ रोजी पहाटे मुलगी आरोपीला भेटण्यासाठी गेली असता आरोपी कृष्णा अच्युत फड याने तिला मोटारसायकलवरून रेल्वे फाट्याजवळ नेले. तेथे आधीच कार घेऊन थांबलेल्या सहआरोपी गणेश बसुराज फड (वय २० वर्षे) याने त्या दोघांनाही कारमध्ये बसवून घेतले. त्यातील सहआरोपी गणेश बसुराज फड याने रत्नागिरी येथे राहण्याची सर्व सोय केल्याचे सांगितले होते. वाटेत मुलीने विरोध केला असता तिला गप्प बसवण्यात आले. त्यानंतर तिला रत्नागिरी येथे मुख्य आरोपी कृष्णा अच्युत फड याने दिलेल्या पत्त्यावर नेऊन . जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून नोंद झालेल्या या गुन्ह्यात १८/७/२०२६ रोजी पीडितेचा शोध लागल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे. गुन्हा क्रमांक गुरनं ४८७/२०२६ कलम १३७(२), ६४(२), ३(५) बी एन एस सह कलम ४, ६ पोक्सो कायदा आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT