चाकूर : घरणी उड्डाणपुलाजवळ मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता एका पिकअप वाहनातून १९ म्हैस जातीची जनावरे दाटीवाटीने व निर्दयपणे वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने चाकूर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरणी उड्डाण पुलाजवळ मंगळवारी ११ वाजता पिकअप (एमएच ०३ सीडी १७९६) मध्ये ९ म्हैस वगार व १० म्हैस रेडे अशी एकूण १९ जनावरे दाटीवाटीने भरून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी पकडून वाहनासह ३ लाख ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संदीप आण्णाराव साठे यांच्या फिर्यादीवरून रविराज तात्याराव वाघमारे (रा. वर्ताळा, ता. मुखेड, जि. नांदेड) व महंमद रहिम कुरेशी (रा. खैरताबाद, हैद्राबाद) यांच्याविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहे. आय. यू. स्वामी करीत आहेत.