Cow killing in Mandurki
चाकूर : तालुक्यातील मांडुरकी येथे शनिवारी बकरी ईद दिवशी गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी रात्री उशीरा नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, चाकूर तालुक्यातील मांडुरकी गावात बकरी ईद दिवशी गोवंशाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता एका शेतामध्ये बेकायदेशीररित्या उघड्यावर गोवंश गोमासांची विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंशाची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
शेतात पोलिस आल्याची माहिती मिळताच गोवंशाची कत्तल करणारे पळून गेले. पोलिसांनी पशु वैद्यकिय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करून त्याचे नमुने तपासणीस पाठविले आहेत. यामध्ये २८ हजार रूपये किंमतीचे १४० किलो गोवंश गोमांस जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार नंदकुमार रेड्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जम्नु हैदर शेख, शाकीर मकबुल शेख, अफजल सरवर शेख, शौकत हैदर शेख, शाहरुख सत्तार शेख, फारुख सत्तार शेख, वागड शेख, फिरदौस कैसर शेख, सलीम मुसखा पठाण सर्व रा. मांडुरकी यांच्याविरूध्द चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अच्युत सुर्यवंशी करीत आहेत.