Banned Gutka Seized Chakur Latur Pudhari
लातूर

Gutka Seized Chakur | चाकूरमध्ये पावणे चार लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त; एकावर गुन्हा दाखल

Latur Crime | गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि चाकूर पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Banned Gutka Seized Chakur Latur

चाकूर: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पान मसाल्याच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि चाकूर पोलिसांनी मंगळवारी (दि.७) मोठी कारवाई करत तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ७) सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास चाकूर येथील सोसायटी चौक येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख यांच्या पथकाने चाकूर पोलिसांच्या मदतीने एका गोडाऊनवर छापा टाकला. त्या छाप्यात एकूण २५ पोत्यांमध्ये साठवलेला सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. यात विविध प्रकारच्या पॅकेट्सचा समावेश असून एकूण ३, ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख यांच्या फिर्यादीवरून मारुती राजेंद्र सोमवंशी रा. चाकूर याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे हे करत आहेत.

या मोठ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे, चाकूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गोविंद बोळंगे यांचा सहभाग आहे.या मोठ्या कारवाईने गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT