Crime News Pudhari file photo
लातूर

Latur Crime | पत्नीला सासरी पाठवत नाही: घरात घुसून मेव्हण्यावर चाकू हल्ला

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Chakur Taluka Knife Attack

चाकूर : तालुक्यातील झरी बु. येथे पत्नीला सासरी पाठविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकावर चाकू हल्ला केल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि. १७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग बाबुराव जगताप यांच्या घरी त्यांचा मेव्हणा महादेव रामकिशन ढमाले (रा. इंदिरानगर, लातूर) आला असताना त्याने पत्नीला सोबत पाठविण्याच्या कारणावरून घरात मोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ सुरू केली.

यावेळी पांडुरंग व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता संतापाच्या भरात जवळील चाकू काढून पांडुरंग यांचा चुलत भाऊ बालाजी भाऊराव जगताप याच्या उजव्या बरगडीवर त्याने वार केला. तसेच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरही वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

तसेच महादेव ढमाले याने पांडुरंग जगताप यांनाही चाकूने जखमी केले तसेच त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली.

जखमी बालाजी जगताप याच्यावर सध्या लातूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पांडुरंग जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव ढमाले यांच्या विरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी पाहणी केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT