लातूर

Latur News | लातुरात बुलेट पेटली, टाकीचा स्फोट

पेट्रोल लिकेज झाल्याने तसेच बुलेट तापली असल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

लातूर : येथील उस्मानपुरा परिसरात बुधवारी (दि. २२) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास एका बुलेटला अचानक आग लागली व काही क्षणात ती भडकली व टाकी फुटून स्फोट झाला. स्फोटामुळे ज्वाला सुमारे दोन मजली इमारती इतक्या उंचावर गेल्या होत्या. पेट्रोल गळतीमुळे हा प्रकार झाल्याची माहिती आहे.

सकाळी एक व्यक्ती या बुलेटवरून जात होती. उस्मानपुरा परिसरात ती आली असता बुलेटस्वाराला बुलेटच्या टाकीखाली आग लागल्याचे दिसले. तातडीने त्याने गाडी पार्क केली व पाण्याची बाटली घेऊन तो तेथे आला दरम्यान आग भडकली होती. तेथे उपस्थित असलेल्यांनी पाईपने पाण्याचे फवारे बुलेटवर मारले मात्र ती आग अधिकच भडकली व अचानक स्फोट झाला. पेट्रोल लिकेज झाल्याने तसेच बुलेट तापली असल्याने आग लागली असावी.

विशेष म्हणजे टाकीतील पेट्रोल आगीमुळे तापले असावे गॅस निर्माण झाला असावा गॅस बाहेर पडण्यास वाट मिळाली नसल्याने स्फोट झाला असावा असा आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञांचा तर्क आहे. मात्र शहरात उन्हामुळे बुलेट पेटली अशी चर्चा होती. सकाळी ही घटना घडल्याने तसेच पेट व स्फोट होण्यासारखी अनुकूलता नसल्याने उन्हामुळे गाडीने पेट घेतली नसावी असेही अनेकजण सांगत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT