Lightning Strike Cattle Death Pudhari
लातूर

Latur Unseasonal Rain | अहमदपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा : वीज पडून तीन म्हैशी, बैल दगावला

विजांच्या कडकडाटामुळे विविध ठिकाणी पशुधनाची मोठी हानी

पुढारी वृत्तसेवा

Lightning Strike Cattle Death

अहमदपूर : मान्सूनपूर्व वातावरणीय बदलामुळे अहमदपूर तालुक्यात २५ मे रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसादरम्यान झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे विविध ठिकाणी पशुधनाची मोठी हानी झाली आहे. वीज पडून तीन म्हशी आणि एक बैल दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

आनंदवाडी (काळेगाववाडी) येथील शेतकरी तुळशीराम सिद्राम केंद्रे यांच्या शेतातील म्हैस अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. तसेच हगदळ येथील बालाजी लक्ष्मण उप्परवाड यांचीही एक म्हैस रात्री वीज पडून मृत्यूमुखी पडली.

याशिवाय सताळा येथील शेतकरी रामदास धोंडीबा इरले यांची म्हैस वीज कोसळल्याने दगावली, तर मांगदरी येथील शेतकरी शिवाजी बळीराम देवकत्ते यांचा बैल वीज पडून मृत झाला.

घटनांची माहिती मिळताच तहसील प्रशासनाच्या वतीने संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामे करण्यात आले. ऐन पेरणीच्या तोंडावर पशुधन गमावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT