File Photo
लातूर

लातूर : बारावीचा विद्यार्थी नदीपात्रात बुडाला

म्हैशीला पाण्याबाहेर काढण्यासाठी गेला होता नदीत

पुढारी वृत्तसेवा

देवणी : बारावीची परीक्षा देत असलेला एक विद्यार्थी मांजरा नदीपात्रातील पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. गुणवंत उर्फ प्रथमेश धनाजी सोमवंशी असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो बारावी कला शाखेची परीक्षा देत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुणवंत यांचे वडील पुणे येथे मंजुरी करतात. तर आई रोजंदारीने कामावर जाते. मंगळवारी परीक्षा नसल्याने गुणवंत आईसोबत शेतात जाऊन म्हैस चारत होता. म्हैस पाण्यात गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी पाण्यात गेला पण पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याची माहिती नदीच्या तिरावर असलेल्या शेतकऱ्यांनी दिली. आकस्मिक ओढावलेल्या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT