किनगावात युवकावर चाकूहल्ला File Photo
लातूर

Latur Crime : किनगावात युवकावर चाकूहल्ला; ६ जणांवर गुन्हा

आरोपींच्या शोधा साठी दोन पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानक परिसरात युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहीत महादेव दहीफळे (वय २३ ) असे जखमी युवकाचे नाव आहे.

चिखली येथील रोहीत दहीफळे याला गुरुवारी दुपारी किनगाव येथील बस स्थानक परिसरात असलेल्या स्विट होम समोर हल्लेखोरांनी बोलावून घेतले. त्यानंतर वाद घालत त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.जखमी युवकावर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादी रोहित दहिफळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश घुले (रा. मोळवण हंगामी किनगाव याच्यासह आणखी ५ जणांवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी २ तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले,सपोनी माणिक डोके,उपनिरीक्षक सत्यजित तोंडारे,वलमपल्ले यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT