Chandranagar Cleanliness Drive pudhari photo
लातूर

Chandranagar Cleanliness Drive : आयएमएच्या शहर स्वच्छता उपक्रमास चंद्रनगरातून सुरुवात

लातूर : वर्षभराचे वेळापत्रक तयार, लोकसहभाग वाढवण्याचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

लातूर : लातूर शहर हरीत स्वच्छ व पयार्वरणाणुकुल करण्याचा संकल्प आयएमएच्या लातूर शाखेने केला असून या विधायक उपक्रमास त्यांनी सुरुवातही केली आहे. शहर स्वच्छतेचे वर्षभराचे नियोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात मंगळवारी (दि.9) चंद्रनगर येथून परिसर स्वच्छतेने करण्यात आली. या सेवाकार्यात डॉक्टर्स, मनपा कर्मचारी तसेच त्या परिसरातील नागरीक सहभागी झाले होते.

च्ंद्रनगर येथील वर्धमान उद्यानात स्वच्छता करण्यात आली. पालापाचोळा,प्लास्टिक संकलीत करण्यात आले. उद्यानातील झाडांना आळे करण्यात आले. दोन ट्रॅक्टर कचरा संकलीत करण्यात आला. यात कॅरीबँग्जही असल्याने डॉक्टरांनी तेथील नागरीकांना प्लास्टिकचा कॅरीबॅग्जचा वापर करु नका कापडी पिशव्या वापरा असे आवाहन केले.

त्यानंतर डॉक्टरांनी त्या परिसरातील रसत्यांची स्वच्छता केली. दरम्यान आयएमएचे हे स्वच्छता अभियान वर्षभर सुरू राहणार असून दर महीन्याच्या 9,19 व 29 तारखेला ही स्वच्छता होणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. स्वच्छता श्रमदानाच्या तारखेची पूर्वकल्पना त्या भागातील नागरीकांना देण्यात येणार असून त्यांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

शहर स्वच्छतेत लोकसहभाग वाढावा व हे अभियान लोकचळवळ व्हावी असा आएमएमएचा मानस असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार असल्याचे लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत व सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी सांगितले. लातूर महापालिका आयुक्त मानसी मीना , उपायुक्त वसुधा फड व त्याच्या टिमचे याकामी सहकार्य लाभत असल्याचे ते म्हणाले.

चंद्रनगर येथील स्वच्छता कामात डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. विश्रांत भारती, डॉ. श्वेता पवार, डॉ. वर्षा दराडे, डॉ. आकांक्षा अवस्थी , डॉ. शुभांगी राऊत, डॉ. वेदांत अवस्थी, डॉ. गणेश पवार, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. शैला सोमाणी, डॉ आंनद कलमे, जयप्रकाश चितकोटे, सुनीता चितकोटे, अजय शहा, संजय बोरा, सुमन कलंत्री, आशिष कलंत्री,सुभाष दुर्गवाड यांच्यासह त्या परिसरातील नागरीक व महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT