राळगा शिवारात अडीच लाखांची अवैध वाळू जप्त pudhari photo
लातूर

Illegal Sand Seized : राळगा शिवारात अडीच लाखांची अवैध वाळू जप्त

जप्त वाळू आठ घरकुलधारकांना वाटप

पुढारी वृत्तसेवा

अहमदपूर : तालुक्यातील राळगा शिवारात महसूल व पोलीस प्रशासनाने छापा घालून 2 लाख 50 हजार रुपये किमतीचा अवैध वाळूचा साठा जप्त केला. साठवून ठेवलेली 40 ते 50 ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, नांदेड- लातूर राष्ट्रीय महामार्ग ( 361)लगत असलेल्या राळगा शिवारात गंगाखेड व नांदेड येथील गोदावरीच्या नदीपात्रातील रेती चोरट्या मार्गे आणली असून त्याची साठवण केल्याची माहिती तहसीलदार उज्वला पांगरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांना मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाचे पथक सबंधित स्थळी पोहोचून त्या ठिकाणी आढळून आलेल्या अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई 5 फेब्रुवारी रोजी सकाळी केली. जप्त केलेली वाळू आठ घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्याचा स्तुतीदायक उपक्रम राबवला.

अवैध वाळू जप्त मोहिमेत अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विनोद मेत्रेवार, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल , मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर, बीट अंमलदार मारुती शिंदे, ग्राम महसूल अधिकारी ज्योती देवरवाडे, अविनाश पवार आणि सुरेंद्र गिरीयांनी सहभाग नोंदवत कौतुकास्पद कार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT