निलंगा : इस्लाम धर्म हा भाईचारा आणि शांतीचा संदेश देणारा असून इस्लाम धर्माच्या अनुयायींनी शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे आपले विचार आचरणात आणून त्याचे पालन करावे, असे आवाहन निलंगा येथे आयोजित 'इज्तेमा'त दुसऱ्या बायन प्रवचनामध्ये करण्यात आले. मंगळवारी दुवाच्या वेळेपर्यंत जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थिती लावली.
सोमवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक धर्मगुरू कुरआन, हदीसवर प्रवचन करीत होते. आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासणे आवश्यक असून, विश्वशांतीची गरज आहे. मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश देण्याबरोबर कुरआनच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे पवित्र कुराण जीवन जगण्यासाठी असून पवित्र ग्रंथ कुराण हे फक्त मुसलमानांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सदार डॉ.शिवाजी काळगे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके राष्ट्रवादी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींनी भेटी दिल्या.