उदगीर : उदगीर शहरातील २६ वर्षीय विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ८० लाख रुपये घेऊन ये. असे म्हणून सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सासरा आणि दिराने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी रविवारी (दि.१) पहाटे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ८ मार्च २०२० ते २६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत विवाहितेस सासरी मौजे डोंनगाव (ता. कमलनगर जि.बीदर, कर्नाटक) येथे सासरच्या मंडळींनी आपसात संगनमत करून तुला जर घरात रहायचे असेल तर प्लॅट घेण्यासाठी ८० लाख रुपये घेवुन ये म्हणून शिवीगाळ करुन, मारहाण करुन, शारीरीक व मानसिक छळ केला. तसेच दिर व सासरे यांनी विवाहितेचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेचे १६ तोळ्याचे दागीने विश्वासाने घेवून परत न देता परस्पर विकुन टाकून विश्वसघात केला.
याबाबतची तक्रार २६ वर्षीय विवाहितेने दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पती- गणेश श्रीकांत शेगेदार, सासू तेजम्मा श्रीकांत शेगेदार, दिर- दिलीप श्रीकांत शेंगेदार, सासरे- श्रीकांत विश्वनाथ शेंगेदार (रा. डोणगाव ता. कमलनगर, जि. बिदर, कर्नाटक), नणंद- कलावती रमाकांत बेंबरेकर (रा. देगलुर, ता. देगलुर, जि. नांदेड), नणंद- सुजाता शिवशंकर मठपती (रा.हुबळी राज्य कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.