Guardian Minister Bhosale inspected the damage caused by floods in Ujani
लातूर, पुढारी वृत्तसेवा : तेरणा नदीला आलेल्या पुराने उजनी येथील शेतपिके, घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली.
पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच तेरणा नदीवर उजनी गावाजवळ पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, उपअभियंता रोहन जाधव यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते. नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे झालेले नुकसान, नदीकाठावरील घरात पाणी जावून झालेली पडझड, रस्त्यांचे नुकसान आदी बाबींची पालकमंत्री श्री. भोसले यांनी पाहणी केली.
तसेच या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी यांच्याकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच उजनी गावाजवळ तेरणा नदीवर पूल उभारण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच महामार्गाच्या पुलाची वाढविण्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.